Skip to main content

Posts

आठवण

 आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad 

मनातील चित्रं

 काही दिवसापासून एक वेगळेच चित्र मनात येतयं, माहीत नाही पण स्पष्ट दिसत नाहीये... भास होतोय ते चित्र आपलंच आहे. पण ती नजर सापडत नाहीये.... कोणताही विचार करताना, डोळ्यासमोर तेच चित्रं येतंय. काहीतरी त्यात आहे असं मन सांगतंय.. अंदाज लागत नाहीये, काय असेल त्या चित्रात? गुलाबापरी कल्पना.......व्यक्त होेय नाहीये शब्दात.... हळू हळू त्यावरचा धूर्कटपणा आता कमी होऊ लागला आहे . चित्र काय आहे तेही समजू लागलं आहे.  आपलंच ते चित्रं आहे..... ती बघण्याची नजर आता मिळाली आहे.... Written by_Om_Gaikwad 

तुझ्यासाठी.... (A self-made poem)

  तुझ्यासाठी .... काय लिहु मी, कसे लिहु मी.. तुझ्यासाठी.... लिहावे एवढे माझ्याकडे शब्द नाहीत. तुझ्या आठवणीत वेगळाच आनंद आहे. तुझ्यावर कविता करणे मजला छंद आहे. तुझ्यासाठी.. काय लिहु मी, कसे लिहु मी!!! जगातील सुदंर क्षण तुझ्यासोबत आहे.. जगातील दुःखाचा क्षण तुझ्यासोबत नसणे आहे. तुझ्यासाठी..... काय लिहु मी, कसे लिहु मी??? सोबतच्या काही आठवणीत , आयुष्याचा आनंदी वेळ आहे. मैत्री तुझी अशी मजला लाभली, जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. तुझ्यासाठी.... काय लिहु मी, कसे लिहु मी??? ना या कवितेत शब्द रचले, ना या कवितेत सुर रचले, ही कविता तुझ्यासाठी, या आनंदमयी जीवनात अजुन एक सुंदर आठवणीसाठी... _Written by Om gaikwad 

आमची शाळा

  श्री गणेशा जिथे गिरवला, बे चा पाढा जिथे शिकवला जिथे विद्येचा अर्थ समजला, तीच आमची शाळा......!!! जिथे ज्ञानाची भूक भागली, अभ्यासाची गोडी लागली, जिथे यशाची चव चाखली, तीच आमची शाळा......!!! शिक्षक आम्हा असे लाभले, ज्यांनी आमचे हित जाणले, अशक्य जिथे शक्य झाले, तीच आमची शाळा......!!! जिथे स्वप्नांनी पंख फुटले, जिथे प्रगतीचे मार्ग सुचले, भविष्य जिथे उज्वल घडले, तीच आमची शाळा......!!! कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा, रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा, एक ठोका, दोन ठोके तर, टन टन वाजणारी घंटा म्हणजे शाळा, मैत्री भांडणाची जोड म्हणजे शाळा......!!! सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शाळा, पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा, प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा, शिक्षकांच्या हातातील छडी म्हणजे शाळा......!!!!! उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा, उरात साठवलेले असंख्य स्वप्न म्हणजे शाळा, आयुष्याच्या वळणावरच गोड स्वप्न म्हणजे शाळा, अशी माझी शाळा, अशी माझी शाळा......!!!💝 Written by_Om Gaikwad  

कविता माझी साधी

  कविता माझी खूपच साधी साधी मनातल्या भावना जपणारी.. मनाशी नाते ती जोडणारी  कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी... मनातल्या स्वप्नांत ती रमणारी  रममाण होऊन सन्मानाने ती उडणारी  प्रेत्येत नर नारी पर्यंत पोहोचणारी... कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी  कोणाचे गोड कौतुक करणारी बाळाची ती अंगाई गाणारी.. वसंत ऋतूत बहरणारी.. कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी... मनातले शब्द बाहेर निघते , निघुनी या कवितेत समावते  सामावून आठवण बनते  कवितेच्या रूपाने मनातले भाव प्रकट करते.... कविता माझी खूपच  साधी साधी पण मनातल्या भावना जपणारी... Written by _Om Gaikwad 

आनंदी रहायचं आहे....

  विसरुनी सारे दुःख माझे आज आनंदी मला रहायचं आहे...... . माझी वेगळीच धून बनवून त्यातच रमायचे आहे. वाटेतील वाईट काट्यांना वेचून दुर करायचे आहे. आज आनंदी मला रहायचं आहे ...... स्वतःचं जग बनवून त्यातच आता जगायचे आहे. येणारे दुःख लांबूनच पळवून लावायचे आहे आयुष्यात दुखः नो एंट्री करायची आहे. आज आनंदी मला रहायचं आहे..... खळखळनाऱ्या झऱ्यासारखं आज वाहतच जायचं आहे. स्वतःच आकाशातील चंद्र बनून इतरांना आनंद वाटायचा आहे. आज आनंदी मला रहायचं आहे.... आज आनंदी मला रहायचं आहे....... Written by_Om Gaikwad