आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
काही दिवसापासून एक वेगळेच चित्र मनात येतयं,
माहीत नाही पण स्पष्ट दिसत नाहीये...
भास होतोय ते चित्र आपलंच आहे.
पण ती नजर सापडत नाहीये....
कोणताही विचार करताना, डोळ्यासमोर तेच चित्रं येतंय.
काहीतरी त्यात आहे असं मन सांगतंय..
अंदाज लागत नाहीये, काय असेल त्या चित्रात?
गुलाबापरी कल्पना.......व्यक्त होेय नाहीये शब्दात....
हळू हळू त्यावरचा धूर्कटपणा आता कमी होऊ लागला आहे .
चित्र काय आहे तेही समजू लागलं आहे.
आपलंच ते चित्रं आहे.....
ती बघण्याची नजर आता मिळाली आहे....
Written by_Om_Gaikwad
Comments
Post a Comment