आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
कविता माझी खूपच
साधी साधी
मनातल्या भावना जपणारी..
मनाशी नाते ती जोडणारी
कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी...
मनातल्या स्वप्नांत ती रमणारी
रममाण होऊन सन्मानाने ती उडणारी
प्रेत्येत नर नारी पर्यंत पोहोचणारी...
कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी
कोणाचे गोड कौतुक करणारी
बाळाची ती अंगाई गाणारी..
वसंत ऋतूत बहरणारी..
कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी...
मनातले शब्द बाहेर निघते , निघुनी या कवितेत समावते
सामावून आठवण बनते
कवितेच्या रूपाने मनातले भाव प्रकट करते....
कविता माझी खूपच
साधी साधी
पण मनातल्या भावना जपणारी...
Written by _Om Gaikwad
Comments
Post a Comment