श्री गणेशा जिथे गिरवला,
बे चा पाढा जिथे शिकवला
जिथे विद्येचा अर्थ समजला,
तीच आमची शाळा......!!!
जिथे ज्ञानाची भूक भागली,
अभ्यासाची गोडी लागली,
जिथे यशाची चव चाखली,
तीच आमची शाळा......!!!
शिक्षक आम्हा असे लाभले,
ज्यांनी आमचे हित जाणले,
अशक्य जिथे शक्य झाले,
तीच आमची शाळा......!!!
जिथे स्वप्नांनी पंख फुटले,
जिथे प्रगतीचे मार्ग सुचले,
भविष्य जिथे उज्वल घडले,
तीच आमची शाळा......!!!
कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि
ग्रंथालय म्हणजे शाळा,
रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा,
एक ठोका, दोन ठोके तर,
टन टन वाजणारी घंटा म्हणजे शाळा,
मैत्री भांडणाची जोड म्हणजे शाळा......!!!
सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शाळा,
पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा,
प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा,
शिक्षकांच्या हातातील छडी म्हणजे शाळा......!!!!!
उत्तुंग जगाकडे बघणारी
केविलवाणी नजर म्हणजे शाळा,
उरात साठवलेले असंख्य स्वप्न म्हणजे शाळा,
आयुष्याच्या वळणावरच गोड स्वप्न म्हणजे शाळा,
अशी माझी शाळा, अशी माझी शाळा......!!!💝
Written by_Om Gaikwad
Comments
Post a Comment