Skip to main content

Posts

आठवण

 आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad 

आमची शाळा

  श्री गणेशा जिथे गिरवला, बे चा पाढा जिथे शिकवला जिथे विद्येचा अर्थ समजला, तीच आमची शाळा......!!! जिथे ज्ञानाची भूक भागली, अभ्यासाची गोडी लागली, जिथे यशाची चव चाखली, तीच आमची शाळा......!!! शिक्षक आम्हा असे लाभले, ज्यांनी आमचे हित जाणले, अशक्य जिथे शक्य झाले, तीच आमची शाळा......!!! जिथे स्वप्नांनी पंख फुटले, जिथे प्रगतीचे मार्ग सुचले, भविष्य जिथे उज्वल घडले, तीच आमची शाळा......!!! कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा, रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा, एक ठोका, दोन ठोके तर, टन टन वाजणारी घंटा म्हणजे शाळा, मैत्री भांडणाची जोड म्हणजे शाळा......!!! सकाळची प्रार्थना आणि दुपारचा भात म्हणजे शाळा, पाठीवर दप्तर आणि अंगात गणवेश म्हणजे शाळा, प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज म्हणजे शाळा, शिक्षकांच्या हातातील छडी म्हणजे शाळा......!!!!! उत्तुंग जगाकडे बघणारी केविलवाणी नजर म्हणजे शाळा, उरात साठवलेले असंख्य स्वप्न म्हणजे शाळा, आयुष्याच्या वळणावरच गोड स्वप्न म्हणजे शाळा, अशी माझी शाळा, अशी माझी शाळा......!!!💝 Written by_Om Gaikwad  

कविता माझी साधी

  कविता माझी खूपच साधी साधी मनातल्या भावना जपणारी.. मनाशी नाते ती जोडणारी  कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी... मनातल्या स्वप्नांत ती रमणारी  रममाण होऊन सन्मानाने ती उडणारी  प्रेत्येत नर नारी पर्यंत पोहोचणारी... कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी  कोणाचे गोड कौतुक करणारी बाळाची ती अंगाई गाणारी.. वसंत ऋतूत बहरणारी.. कवितेच्या रूपाने भाव ती प्रकट करतांनी... मनातले शब्द बाहेर निघते , निघुनी या कवितेत समावते  सामावून आठवण बनते  कवितेच्या रूपाने मनातले भाव प्रकट करते.... कविता माझी खूपच  साधी साधी पण मनातल्या भावना जपणारी... Written by _Om Gaikwad 

आनंदी रहायचं आहे....

  विसरुनी सारे दुःख माझे आज आनंदी मला रहायचं आहे...... . माझी वेगळीच धून बनवून त्यातच रमायचे आहे. वाटेतील वाईट काट्यांना वेचून दुर करायचे आहे. आज आनंदी मला रहायचं आहे ...... स्वतःचं जग बनवून त्यातच आता जगायचे आहे. येणारे दुःख लांबूनच पळवून लावायचे आहे आयुष्यात दुखः नो एंट्री करायची आहे. आज आनंदी मला रहायचं आहे..... खळखळनाऱ्या झऱ्यासारखं आज वाहतच जायचं आहे. स्वतःच आकाशातील चंद्र बनून इतरांना आनंद वाटायचा आहे. आज आनंदी मला रहायचं आहे.... आज आनंदी मला रहायचं आहे....... Written by_Om Gaikwad  

एक दिवस

  एक दिवस येईल असा ...... आनंदाने भरलेला  दुःख सारी विसरून जातील  स्नेहामध्ये सारे न्हातील वाट तु पहा जरा.... एक दिवस येईल असा..... प्रेमाने ओथंबलेला  सारे जण या एक होऊ  गीत आनंदाचे गाऊ सांगू या विश्वाला एक दिवस येईल असा.... समृध्दीने नटलेला  हिरवा हिरवा गार परिसर  रम्य शेते दिसतील सुंदर पडेल पाऊस जेव्हा.. एक दिवस येईल असा....... समाधान असलेला  कष्ट सारे फळा येतील  विजयपताका नभी फडकतील ठेव तु विश्वास हा.... एक दिवस येईल असा....... स्वप्नामध्ये दिसलेला नसेल दुःखी जगात कोणी खातील सारे तूप नि लोणी स्वप्न तु पहात रहा.. एक दिवस येईल असा.... Written by_Om Gaikwad 

प्रेरणा तु

  शब्दही तु श्वासही तु  मनातील भावना निर्माण करणारी  माझ्या कवितेची प्रेरणा तु... तुझ्याविना अपुरी ही कविता माझी  तूझ्या विचारात न हरवून बनवलेली कविता कविता कसली? माझ्या मनातील खास व्यक्ती तु  हया जगातील सर्वात सुंदर व्यक्ती तु.. पहिल्या भेटची आपल्या आतुरता मला दाटली पण माहीत नाही कधी भेटशील तु.. शब्दही तु श्वासही तु  मनातील भावना निर्माण करणारी  माझ्या कवितेची प्रेरणा तु... Written_by Om Gaikwad