आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
एक दिवस येईल असा......
आनंदाने भरलेला
दुःख सारी विसरून जातील
स्नेहामध्ये सारे न्हातील
वाट तु पहा जरा....
एक दिवस येईल असा.....
प्रेमाने ओथंबलेला
सारे जण या एक होऊ
गीत आनंदाचे गाऊ
सांगू या विश्वाला
एक दिवस येईल असा....
समृध्दीने नटलेला
हिरवा हिरवा गार परिसर
रम्य शेते दिसतील सुंदर
पडेल पाऊस जेव्हा..
एक दिवस येईल असा.......
समाधान असलेला
कष्ट सारे फळा येतील
विजयपताका नभी फडकतील
ठेव तु विश्वास हा....
एक दिवस येईल असा.......
स्वप्नामध्ये दिसलेला
नसेल दुःखी जगात कोणी
खातील सारे तूप नि लोणी
स्वप्न तु पहात रहा..
एक दिवस येईल असा....
Written by_Om Gaikwad
Comments
Post a Comment