आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
सगळं आकाश माझ्या पायापाशी,पण का?
लागली आस मला जीवनाची....
सगळं जीवन माझ्या हाताशी, पण का?
लागली आस मला माझ्या उद्याची.
सूर्य माझ्यासाठी उगवणारा, पण का?
मला भीती त्याच्या डूबण्याची.
या प्रकाशमय वातावरणात का?
आस मला काळोख्या रात्रीची....
रात्रीचा हा काळोख
त्यात किरकिरणारा रातकिडा..
कुठे हरवला माझा सोनेरी क्षणाचा झरा...
संपूर्ण विश्व माझ्या जवळ....
पण का?
आहे आस मला जीवनाची....
_Written by_Om Gaikwad
Comments
Post a Comment