आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
तुझ्यासाठी .... काय लिहु मी, कसे लिहु मी.. तुझ्यासाठी.... लिहावे एवढे माझ्याकडे शब्द नाहीत. तुझ्या आठवणीत वेगळाच आनंद आहे. तुझ्यावर कविता करणे मजला छंद आहे. तुझ्यासाठी.. काय लिहु मी, कसे लिहु मी!!! जगातील सुदंर क्षण तुझ्यासोबत आहे.. जगातील दुःखाचा क्षण तुझ्यासोबत नसणे आहे. तुझ्यासाठी..... काय लिहु मी, कसे लिहु मी??? सोबतच्या काही आठवणीत , आयुष्याचा आनंदी वेळ आहे. मैत्री तुझी अशी मजला लाभली, जीवनाला वेगळीच दिशा मिळाली. तुझ्यासाठी.... काय लिहु मी, कसे लिहु मी??? ना या कवितेत शब्द रचले, ना या कवितेत सुर रचले, ही कविता तुझ्यासाठी, या आनंदमयी जीवनात अजुन एक सुंदर आठवणीसाठी... _Written by Om gaikwad
Comments
Post a Comment