Skip to main content

Posts

आठवण

 आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad 

आनंदी रहायचं आहे....

  विसरुनी सारे दुःख माझे आज आनंदी मला रहायचं आहे...... . माझी वेगळीच धून बनवून त्यातच रमायचे आहे. वाटेतील वाईट काट्यांना वेचून दुर करायचे आहे. आज आनंदी मला रहायचं आहे ...... स्वतःचं जग बनवून त्यातच आता जगायचे आहे. येणारे दुःख लांबूनच पळवून लावायचे आहे आयुष्यात दुखः नो एंट्री करायची आहे. आज आनंदी मला रहायचं आहे..... खळखळनाऱ्या झऱ्यासारखं आज वाहतच जायचं आहे. स्वतःच आकाशातील चंद्र बनून इतरांना आनंद वाटायचा आहे. आज आनंदी मला रहायचं आहे.... आज आनंदी मला रहायचं आहे....... Written by_Om Gaikwad  

एक दिवस

  एक दिवस येईल असा ...... आनंदाने भरलेला  दुःख सारी विसरून जातील  स्नेहामध्ये सारे न्हातील वाट तु पहा जरा.... एक दिवस येईल असा..... प्रेमाने ओथंबलेला  सारे जण या एक होऊ  गीत आनंदाचे गाऊ सांगू या विश्वाला एक दिवस येईल असा.... समृध्दीने नटलेला  हिरवा हिरवा गार परिसर  रम्य शेते दिसतील सुंदर पडेल पाऊस जेव्हा.. एक दिवस येईल असा....... समाधान असलेला  कष्ट सारे फळा येतील  विजयपताका नभी फडकतील ठेव तु विश्वास हा.... एक दिवस येईल असा....... स्वप्नामध्ये दिसलेला नसेल दुःखी जगात कोणी खातील सारे तूप नि लोणी स्वप्न तु पहात रहा.. एक दिवस येईल असा.... Written by_Om Gaikwad 

प्रेरणा तु

  शब्दही तु श्वासही तु  मनातील भावना निर्माण करणारी  माझ्या कवितेची प्रेरणा तु... तुझ्याविना अपुरी ही कविता माझी  तूझ्या विचारात न हरवून बनवलेली कविता कविता कसली? माझ्या मनातील खास व्यक्ती तु  हया जगातील सर्वात सुंदर व्यक्ती तु.. पहिल्या भेटची आपल्या आतुरता मला दाटली पण माहीत नाही कधी भेटशील तु.. शब्दही तु श्वासही तु  मनातील भावना निर्माण करणारी  माझ्या कवितेची प्रेरणा तु... Written_by Om Gaikwad 

काय झालंय कळेना...

  आज काय झालंय कळेना... एक वेगळाच आनंद मनी आहे. का? कोणासाठी? समजेना.... नकळत हसू येते, नकळत रडू येते. पण आज काय झालंय कळेना... क्षणात मनी हर्षाचे ढग दाटू लागतात, क्षणात कोणाच्या तरी आठवणीने तेच ढग बरसू लागतात. आठवण!!!! आठवण ही एक साठवण असते. कधी येईल कधी जाईल, हे ही सांगता येईना.. पण आज काय झालंय कळेना... शब्द रचता रचता कविताच तयार झालीये हे ही लक्ष्यात येईना.... ओम लिहीत चाललाय थांबायचे समजेना.. आजची ही रात्र ओळखीचीही वाटेना, वाट पाहतोय पण रात्र सरता सरेना.. आज काय झालंय कळेना.... एक वेगळाच आनंद मनी आहे. का? कुणासाठी? समजेना ...... Written_by Om Gaikwad

आस ...

सगळं आकाश माझ्या पायापाशी,पण का? लागली आस मला जीवनाची.... सगळं जीवन माझ्या हाताशी, पण का? लागली आस मला माझ्या उद्याची. सूर्य माझ्यासाठी उगवणारा, पण का? मला भीती त्याच्या डूबण्याची.  या प्रकाशमय वातावरणात का? आस मला काळोख्या रात्रीची.... रात्रीचा हा काळोख त्यात किरकिरणारा रातकिडा.. कुठे हरवला माझा सोनेरी क्षणाचा झरा... संपूर्ण विश्व माझ्या जवळ.... पण का? आहे आस मला जीवनाची.... _Written by_Om Gaikwad