आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
पाऊस पहिल्या सरींचा गंध दरवळतो, मनाचा तो कोपरा भिजवतो, स्मृतींच्या ओलाव्याने सजलेला, तो पहिला पाऊस आठवतो। काळ्या ढगांतून येते सावली, धरतीला नवी चादर घाली, मनाच्या गाभाऱ्यात नांदते, त्या पावसाची आठवण खासच भारी। थेंब थेंब पाण्याचे पैंजण, निसर्गाच्या त्या गाण्याचा साजण, बालपणातले ते खेळ वेगळे, त्या पावसात हरवलेले सगळे। रस्त्यावरच्या त्या डबक्यात उडी, शाळेच्या वाटेवर ती ओढ ओढी, चिंब भिजण्याची मज्जा निराळी, त्या पावसाची गंमत न कधी विसरावी। आजही तो पहिला पाऊस मनात, नव्या सुरांमध्ये गाणे गात, भिजवतो मनाच्या त्या कुपीत, जुन्या आठवणींची दुनिया सजवित। जणू साऱ्या आठवणींचा तो वारसा, पाऊस येतो नेहमी नव्याने फुलवायला, आणि मनातलं कोपरे शांत करत, त्याच्या गाण्यांत जीव रमवायला। Written by _Om gaikwad