आठवणींच्या त्या गोड क्षणांची, जपून ठेवली आहेत ती स्वप्नांची, गंध दरवळतो अजूनही त्या फुलांचा, आठवणीत जीव रमतो त्या मोगऱ्याचा। वेळ गेली तरी स्मृती राहतात, निळ्या आकाशात त्या ताऱ्यांसारख्या चमकतात, मनाच्या कुपीत त्या साठवलेल्या आठवणी, जीवनाच्या वाटेवर सोबत करतात सखेचं गाणी। शाळेतील मित्र, ते खेळाचे मैदान, हसरे चेहरे, नि चिमुकल्या आनंदाच्या गदगद, जुनी गाणी, ते पहिले प्रेमाचे सुर, आठवणींनी उरला तो चिरंतन आनंदाच्या बहर। कधी तरी पावसाच्या सरीत भिजल्यासारख्या, आठवणीही येतात मंद गंधासारख्या, त्या सोबतीत रमतो जीव, नव्या स्वप्नांचा विचार करतो, आठवणींच्या गुलाबांनी जीवनाचं बाग फुलवतो। Writen by _Om Gaikwad
फुलपाखरू............. रंग काळा नभ नी लागला पसरू.... रंग काळा नभ नी लागला पसरू.... बेधुंद बागडणारं , स्वच्छंद खेळणारं , सांगा कुठे हरवलं फुलपाखरू!!!!!!! सांगा कुठे हरवलं फुलपाखरू !!!!!!!!! जिथे तिथे जागेसाठी जंगले कापली.... पाऊस पडेना झाला, धरती तापली..... नाश वेढे कारखाने वाढले , धूर, धुकं , धुरीमध्ये धरती माखली.... हे!!!!!! प्राण धरतीचा गईवरला रे, प्राण वायू गुदमरला रे... पाण्यासाठी जीव कावरला रे!!!! पोत मातीचा घालवला रे... देह नदीचा नासवला रे.... दैत्य कुणी हा जागवला रे!!!!! जीवघेणा विषारी वारा लागला पसरू... जीवघेणा विषारी वारा लागला पसरू... बेधुंद बागडणारं , स्वच्छंद खेळणारं सांगा कुठे हरवलं फुलपाखरू.... सांगा कुठे हरवलं फुलपाखरू....... lyrics by_Om Gaikwad